जिल्हा शिक्षण व प्रशिक्षण संस्था, सिंधुदुर्ग


District Institute of Education and Training, Sindhudurg

Centre of Excellence



आमच्याविषयी (About us)

जिल्हा शिक्षण व प्रशिक्षण संस्था (DIET), सिंधुदुर्ग ही शालेय शिक्षण व क्रीडा विभाग, महाराष्ट्र शासन अंतर्गत शिक्षण सक्षमीकरण शाखेची जिल्हास्तरीय शैक्षणिक शिखर संस्था आहे. राज्य शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण परिषद, महाराष्ट्र (SCERT), पुणे यांच्या मार्गदर्शन व नियंत्रणाखाली जिल्हास्तरीय शैक्षणिक उपक्रमांचे नियोजन, अंमलबजावणी व अनुधावन आमच्या संस्थेमार्फत करण्यात येते. या संस्थेचे प्रशासकीय विभागप्रमुख मा. आयुक्त (शिक्षण), शिक्षण आयुक्तालय, महाराष्ट्र राज्य, पुणे हे आहेत.

जिल्हा शिक्षण व प्रशिक्षण संस्थेचे कार्यालय प्रमुख प्राचार्य, गट-अ (राजपत्रित) शिक्षण उपसंचालक समकक्ष आहेत. वरिष्ठ अधिव्याख्याता, गट-अ (राजपत्रित) 4 पदे शिक्षणाधिकारी समकक्ष आहेत. अधिव्याख्याता गट-ब (राजपत्रित) 6 पदे उपशिक्षणाधिकारी/ गट शिक्षणाधिकारी समकक्ष आहेत. विषय सहायक म्हणून प्रतिनियुक्तीने काम करण्यासाठी 12 ते 14 पदे, IED समन्वयक म्हणून 2 पदे मंजूर आहेत. अधिक्षक, लेखापाल, तंत्रज्ञ, लघुलेखक, कार्यालयीन सहायक, कार्यशाळा सहायक, ग्रंथपाल, लिपिक, शिपाई अशी कार्यालयीन कर्मचारी पदे मंजूर आहेत.